166 भाजप कार्यकर्त्याना विशेष कार्यकारी अधीकारी (SEO)म्हणून प्रमाणपत्र प्रदान


चांगली माणसे घडवणारे लोक म्हणून शासनाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. सबका साथ सबका विकास हेच भाजपचे धोरण आहे. जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडून विशेष कार्यकारी अधिकारी (seo) पदाचा मान वाढावा असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे केले. पनवेल तालुक्यातील 166 भाजप कार्यकर्त्याना विशेष कार्यकारी अधीकारी (SEO)म्हणून प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. नियमांचे काटेकोरपणे पालन करा असेही ते यावेळी म्हणाले.
राज्य शासनाने मान्यता दिलेल्या पनवेल तालुक्यातील 166 भाजप कार्यकर्त्यांना आज रविवारी (दिनांक 19 मार्च) सकाळी 11 वाजता विशेष कार्यकारी अधीकारी (SEO) म्हणून मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मार्केटयार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,युवानेते परेश ठाकूर,जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख,ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन,सी सी भगत, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत,हिना भक्ता,मुग्धा लोंढे, शहराध्यक्ष जयंत पगडे,माजी सभापती अनिल भगत,माजी नगरसेवक नितीन पाटील,एकनाथदादा गायकवाड,तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी,दशरथ म्हात्रे,संजय भोपी,बाळाशेठ ठाकूर,शिवकुमार चौहान आदी मान्यवर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख म्हणाले कि जिल्हापरिषद सदस्य,नगरसेवक यांना जसे साक्षांकनाचे अधिकार असतात तसे एससीओना मिळतात. मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करून साक्षांकन करावेत असे सांगितले. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये एसईओ पदाबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.